चंद्रशेखर जोशी(दापोली) : महाराष्ट्र राज्य देशात फळोत्पादनात प्रथम क्रमांकावर असून कृषी विद्यापीठांच्या संशोधन व विस्तार कार्याच्या माध्यमातून शेतकरी सक्षम होत आहेत. शेतकर्यांना सुखी व समृद्ध करण्यासाठी कृषी संशोधनाला अधिक चालना देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या तीन दिवसीय बैठकीचे उद्घाटन दापोली येथील विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात आज झाले. उद्घाटनानंतर मार्गदर्शन करताना गोगावले बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्याचे कृषी सचिव परिमल सिंह, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खचे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी शर्मा, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी, दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी विद्यापीठाच्या संशोधनामुळे भात तसेच फळपिकांच्या उत्पादनक्षमतेत वाढ झाल्याचे सांगितले. कोकणातील गौआधारित शेती समृद्ध करण्यावर चारही कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
बैठकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांमधील कृषी साहित्य विषयातील एकूण ५५ प्रकाशनांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच राहुरी कृषी विद्यापीठातील डॉ. सचिन नांदगुडे, अकोला कृषी विद्यापीठातील डॉ. सुचिता गुप्ता, परभणी कृषी विद्यापीठातील डॉ. भगवान आसेवार आणि दापोली कृषी विद्यापीठातील डॉ. विजय आवारे यांना यावर्षीचा ‘उत्कृष्ट शास्त्रज्ञ’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मकरंद करमरकर यांनी केले, तर आभार संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला किसान भवन येथे बांधण्यात येणार्या नूतन विश्रामगृहाचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी विद्यापीठाने मागील ५४ वर्षांत शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यात केलेल्या प्रगतीचा आढावा सादर केला. त्यानंतर मान्यवरांनी विद्यापीठाच्या बांबू प्रक्रिया, रबर लागवड, मसाला पिके आदी प्रक्षेत्रांना भेट देऊन संशोधन कार्याचा आढावा घेतला. या बैठकीस सुमारे ३५० हून अधिक शास्त्रज्ञ व अधिकारी उपस्थित होते.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.