loader
Breaking News
Breaking News
Foto

गोविंदा रे ...., गोपाळा च्या गजरात केळशीत गोकुळाष्टमी साजरी

दापोली (प्रतिनिधी) : गोविंदा ‌रे .... , गोपाळा.... च्या गजर करत मोठ्या आनंदी उत्साहात केळशी येथे गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. दापोली तालुक्यातील केळशी या गावाची हिंदू धर्मातील वर्षं भरातील सण-उत्सव साजरा करण्याची सांस्कृतिक परंपरा खूपच न्यारी आहे. वर्षेनुवर्षाची सांस्कृतिक परंपरा आजही केळशीतील ग्रामस्थांनी त्याच भावनेने जपून ठेवली आहे. हे आपल्याला अन्यत्र कुठेही पाहायला मिळणार नाही, इतके ते अप्प्रुप आहे. अशा या केळशी गावात शनिवारी गोकुळाष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केळशी गावचे ग्रामदैवत श्री कालभैरव मंदिराच्या ठिकाणी नवानगर ग्रामस्थ मंडळ (गावकरी), मधला मोहल्ला मुळ (गावकरी), बाजारपेठ, कुंभारवाडा, आतगाव भाट, चिंचवळ, भगत, आळी, कांदेवाडी, खालचा डूंग, बापू आळी, वरचा डूंग आणि गुजरवाडा आदी ठिकाणचे गोविंदाचे मेळ नाचण्यासाठी मोठ्या उत्साहाने आले येथे आलेल्या गोविंदा मेळांना साधारणपणे प्रत्येकी दहा मिनिटे मानाने नाचायला दिले जाते. तर नवानगर ग्रामस्थ मंडळ (गावकरी) आणि खालचा डुंग यांना या मंदिरासमोर परसरावर मानाची दहीहंडी फोडण्याचा मान परंपरेंने दिला गेला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

केळशी गावातील आळ्या, वाड्या आणि पाखाड्यांचे गोविंदापथकांचे मेळ पारंपरिक खालू बाजा अर्थातच ढोल सनई वाद्याच्या आणि गाण्यांच्या तालावर थिरकत गोविंदा पथकांच्या मेळ्यातील सर्वात पुढच्या गोविंदाच्या हाती गदा तर एकाच्या हाती सर्वांत उंच श्रीकृष्णाचा भगवा ध्वज फडकावत होते. एका एका गोविंदा पथकाच्या मेळात पाचापेक्षा अधिक ढोल टिमक्या वाद्यांसह सनईच्या सुरेल आवाजात आळी, वाड्या आणि पाखाड्यांचे गोविंदा हे शिस्तबध्द पध्दतीने आपापल्या पायंड्यांवर थिरकत होते. एका एका गोविंदा पथकाने श्री कालभैरव मंदिराच्या परसावर येऊन आपली मानाची फेरी मारली. एकाच वेळी दहापेक्षा अधिक गोविंदा पथक एकत्र येऊनसुध्दा शिस्तीत अजिबातच बाधा आली नाही.

टाईम्स स्पेशल

श्री कालभैरव मंदिरा ठिकाणी नाचण्यासाठी येणा-या प्रत्येक गोविंदातील मेळातील गोविंदा मग तो लहान असो अथवा वयोवृध्द असो, गरीब असो वा श्रीमंत असो त्याने नवा कोरा करकरीत सदरा लेंगा वा धोतराचा पेहराव केलेला असतो आणि प्रत्येकाच्या डोक्यावर पांढरी शुभ्र गांधी टोपी परिधान केलेली असते. प्रत्येक गोविंदांच्या मेळांसोबत ढोल सनई टिमकी या पारंपारिक वादयाचा बाजा असतो. या वेळी मुखाने गोविंदा घ्या कुणी गोपाळ घ्या..., राधाकृष्णाला संगाती घ्या... , गोविंदा....रे, गोपाळा... यशोदेच्या तान्हया बाळा..... महाराष्ट्राचा भगवा झेंडा नाचाया लागला, गोकुळामध्ये कृष्णा जन्मला.... आठवा अवतार.... अशाप्रकारची जल्लोश आणि मनात जोश निर्माण करणा-या भक्तीमय पदयांच्या गजरात पावलांच्या पायंडयांवर वाद्यांच्या ठेक्यावर गोविंदा मेळातील प्रत्येकजन नाचत होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg