loader
Breaking News
Breaking News
Foto

संजय गांधी निराधार योजनेच्या गुहागर तालुका अध्यक्षपदी विजय मोहिते यांची निवड

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : संजय गांधी निराधार योजना समितीच्या गुहागर तालुका अध्यक्षपदी विजय जनार्दन मोहिते यांची निवड पालकमंत्री तथा उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे काताळे तवसाळ तसेच गुहागर तालुक्यातील नागरिकांकडून, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून निराधार, गरजू, आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल तसेच शासनाच्या मदतीची आवश्यकता असलेल्या लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली जाते. या समितीच्या तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी आता विजय मोहिते यांच्यावर सोपविण्यात आली आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विजय मोहिते यांनी आपल्यावर विश्वास दाखवून ही जबाबदारी दिल्याबद्दल पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत, कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेक, आदी सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तालुक्यातील पात्र आणि गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg