loader
Breaking News
Breaking News
Foto

हवालदार विकास साळवी यांना केंद्र सरकार ‘अति उत्कृष्ट सेवा’ पदकाने गौरव

पनवेल (प्रतिनिधी) :- स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार विकास प्रभाकर साळवी यांना ’अति उत्कृष्ट सेवा पदकाने’ सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशामुळे नवी मुंबई पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विकास साळवी यांनी यापूर्वी एपीएमसी, कळंबोली, खारघर, सीबीडी आणि सध्या पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे आपल्या कर्तव्याची उत्तम छाप पाडली आहे. त्यांना पोलिसांचे बाळकडू घरातील वातावरणातूनच मिळाले. त्यांचे वडील प्रभाकर भालचंद्र साळवी (वय ९३ वर्षे) हे देखील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक आहेत. आपल्या धडक कामगिरीने आणि कर्तव्यनिष्ठेने पोलीस दलाचा नावलौकिक वाढवणार्‍या विकास साळवी यांच्या या बहुमानाबद्दल सर्व स्तरांतून आणि पोलीस प्रशासनातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg