म्हसळा (प्रतिनिधी) - खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही म्हसळ्यात ‘श्रावण सरी’ नृत्य स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी म्हसळा तालुका व शहराच्या वतीने घनसार हॉल, म्हसळा येथे ही स्पर्धा पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख तथा महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात महिलांनी पारंपरिक तसेच सांस्कृतिक नृत्यांचे आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. खारगाव खुर्द महिला मंडळ, सकलप महिला मंडळ, श्रीराम महिला मंडळ म्हसळा, महालक्ष्मी नाच मंडळ पानवे-कोंडे, दत्तकृपा महिला मंडळ निगडी, कर्जाई महिला मंडळ निगडी, नवदुर्गा नाच मंडळ रोहिणी, आबाजी कला वैभव महिला मंडळ रोहिणी, आदिवरदायिनी महिला मंडळ तुरुंबाडी आणि खरसई कोळीवाडा महिला मंडळ आदी संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला.
स्पर्धेत आदिवरदायिनी महिला मंडळ, तुरुंबाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावत १० हजार रुपये, पदक व प्रमाणपत्र मिळविले. श्रीराम महिला मंडळ म्हसळा यांनी द्वितीय क्रमांक मिळवत ७ हजार रुपये नवदुर्गा नाच मंडळ रोहिणी यांनी तृतीय क्रमांक मिळवत ५ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. उत्तेजनार्थ खरसई कोळीवाडा महिला मंडळ आणि कर्जाई महिला मंडळ निगडी यांना प्रत्येकी ३ हजार रुपये, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सहभागी स्पर्धकांचाही रोख रक्कम व पदक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी स्नेहल जगताप यांनी म्हसळ्यातील कार्यक्रमाचे आणि महिलांनी सादर केलेल्या नृत्यकलेचे कौतुक केले. स्पर्धेत जिंकणे महत्त्वाचे असले तरी त्यापेक्षा उत्स्फूर्त सहभाग घेऊन आनंद व्यक्त करणे अधिक महत्त्वाचे आहे. महिलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘श्रावण सरी’सारख्या स्पर्धा मोठी संधी आहेत, असे त्यांनी मनोगतात सांगितले.
कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष समीर बनकर, जिल्हा परिषद सदस्य अनिल बसवत, सभापती बबन मनवे, नगराध्यक्ष सुनील शेडगे, उपसभापती लहू म्हात्रे, कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते महादेव पाटील, पंचायत समिती सदस्या प्रियंका निंबरे, समृद्धी चाचले, मतदारसंघ महिला अध्यक्षा सोनल घोले, माजी अध्यक्षा रेश्मा काणसे, युवती अध्यक्षा वृषाली घोसाळकर, नगरसेविका जयश्री कापरे, नौसिन चोगले, सरोज म्हशीलकर यांच्यासह महेश घोले, मंगेश म्हशीलकर, शेखर खोत, गजानन पाखड, सुजित काते आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्षा मीना टिंगरे, मतदारसंघ अध्यक्षा सोनल घोले, माजी अध्यक्षा रेश्मा काणसे, माजी सभापती छाया म्हात्रे, पंचायत समिती सदस्या प्रियंका निंबरे, समृद्धी चाचले, सरपंच वनिता खोत, सरपंच रश्मी सावंत, नगरसेविका जयश्री कापरे, सरोज म्हशीलकर, नौसिन चोगले, युवती अध्यक्षा वृषाली घोसाळकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष समीर बनकर, स्वागत अशोक काते, तर सूत्रसंचालन अनिकेत पवार यांनी केले. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत लाभली.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.