खेड (दिलीप देवळेकर) : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटात गुरुवारी रात्री कोसळलेली भलीमोठी दरड अद्यापही हटवण्यात आलेली नसल्याने या मार्गावरील वाहतूक गेल्या २४ तासांपासून ठप्प आहे. रस्त्यावर मोठमोठे दगड आणि मातीचा ढिगारा आल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून, घाटमाथ्यापलीकडील सुमारे १५ ते २० गावांचा रत्नागिरी जिल्ह्याशी संपर्क प्रभावित झाला आहे. दरड कोसळल्यामुळे अकलपे-खेड मार्गावरील एसटी बसही घाटात अडकली होती. या बसमध्ये शालेय विद्यार्थी, महिला तसेच अन्य प्रवासी होते. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन अडकलेली एसटी बस पुन्हा अकलपेच्या दिशेने पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, घाटमाथ्यावरील गावांमधून खेड शहरात शाळा, महाविद्यालय, नोकरी तसेच विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांनाही या मार्ग बंदचा मोठा फटका बसला आहे. दरड कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने घटनास्थळी यंत्रसामग्री आणि कर्मचारी तैनात करून रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, रस्त्यावर कोसळलेले दगड आकाराने अत्यंत मोठे असल्याने जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने ते हटवणे कठीण ठरत होते. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर शर्थीचे प्रयत्न करूनही मार्ग पूर्णपणे मोकळा करता आला नाही. अखेर शनिवारी सकाळपासून ब्रेकर मशीनच्या सहाय्याने भलेमोठे दगड फोडून हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मोठे दगड फोडल्यानंतर त्यांचा रस्त्यावरील ढिगारा बाजूला करून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्याचे काम केले जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून हे काम युद्धपातळीवर सुरू असून, शनिवारी सायंकाळपर्यंत रघुवीर घाट वाहतुकीसाठी खुला करण्याचा विश्वास विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. रघुवीर घाट हा रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने तो बंद झाल्यामुळे स्थानिक नागरिकांसह विद्यार्थी, एसटी प्रवासी आणि वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली आहे. दरड हटवण्याचे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद राहणार असून, मार्ग पूर्ववत होण्याकडे दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.