loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड एसटी आगाराच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय, भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने खेड एसटीस्थानक येथे धडक आंदोलन

खेड (प्रतिनिधी) - खेड एसटी महामंडळाच्या खेड आगारातील नियोजनशून्य आणि मनमानी कारभारामुळे शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह ग्रामीण भागातील प्रवाशांचे प्रचंड हाल होत असल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने खेड एसटी बस स्थानकावर जोरदार धडक आंदोलन छेडण्यात आले. भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष अ‍ॅड. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचा वाढता दबाव आणि संतप्त विद्यार्थी-पालकांचा आक्रोश लक्षात घेता आगार प्रशासनाला अखेर नमती घ्यावी लागली असून मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन आगार व्यवस्थापकांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. खेड तालुक्यातील ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांना वेळेवर बसेस न मिळणे, बस थांब्यांवर गाड्या न थांबवता थेट पळवून नेणे आणि आगारातील कर्मचार्‍यांकडून प्रवाशांशी होणारी अरेरावी यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पार्श्वभूमीवर भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड.वैभव खेडेकर यांच्या आक्रमक भूमिकेनंतर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक आगार परिसरात एकत्र आले. प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या तीव्र आंदोलनानंतर खेड आगार व्यवस्थापकांनी भाजपा तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्या नावे अधिकृत लेखी पत्र दिले. यामध्ये शाळा-महाविद्यालयीन फेर्‍या वेळापत्रकानुसार सोडणे, ग्रामीण भागातील सर्व अधिकृत थांब्यांवर बसेस थांबवून विद्यार्थ्यांना घेणे, बसेस न थांबवणार्‍या चालकांवर कारवाई करणे, रात्रवस्तीच्या गाड्या वेळेत सोडणे आणि स्थानकातील स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता राखणे या मागण्या मान्य करण्यात आल्या. तसेच प्रवाशांशी गैरवर्तन करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचे आणि वादग्रस्त कर्मचार्‍याच्या बदलीचा प्रस्ताव सक्षम प्राधिकरणाकडे पाठवण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले.

टाईम्स स्पेशल

यावेळी भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड.मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम भाई सहिबोल, मा.नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्षा आशाताई सनगरे, भाजपा महिला मोर्चा खेड शहर उपाध्यक्ष प्रीती ताई चिखले, भाजपा खेड तालुका उपाध्यक्ष मनोज गायकवाड, भाजपा खेड शहर उपाध्यक्ष राहुल पाटणे, भाजपा युवा मोर्चा खेड तालुकाध्यक्ष विशाल होळकर, भाजपा तालुका उपाध्यक्ष अविराज मोरे, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा खेड शहर सरचिटणीस विजय गुप्ता, मा.नगरसेवक संदेश भुवड, भाजपा खेड शहर चिटणीस अनिकेत पवार, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले, अक्षय सनगरे, मिलिंद शिंदे, प्रदीप भोसले, सुयश खेडेकर यांच्यासह खेड तालुक्यातील सर्व विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg