रत्नागिरी (टाइम्स डिजीटल डेस्क) - सार्वजनीक ठिकाणी विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने फ्लेक्स, पोस्टर्स व बॅनर्स लावून शहराचे विद्रुपीकरण करणार्यांविरोधात जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. याचे जिल्ह्यातील नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. सार्वजनीक ठिकाणी प्रदर्शीत केल्या जाणार्या फ्लेक्सवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परवाना क्रमांक, मुदत, मुद्रक आणि प्रकाश यांचे नाव व पत्ता असणारा क्यू आर कोड ठळकपणे छापणे बंधनकारक आहे. असे आदेश असतानाही याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी अद्याप कारवाई केल्याचे दिसत नाही. त्यामुळे जनतेतून नाराजीचा सूर आहे.
मुद्रक आणि प्रकाशक यांचा उल्लेख नसलेल्या अनेक जाहिराती रत्नागिरीसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी झळकत आहेत. यावर कुणाचाच प्रतिबंध नाही का असा प्रश्न, सुज्ञ नागरिक विचारत आहेत. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी एक दिवसापूर्वी कोणतेही बॅनर किंवा जाहिराती परवानगीसह मुद्रक व प्रकाशकांचा उल्लेख असली पाहिजेत, असे स्पष्ट आदेश काढले आहेत. तसेच संबंधितांवर दंडात्मक कारवाईचे आदेशही दिले आहेत. मात्र रत्नागिरीसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या बॅनर झळकताना दिसत आहेत. संबंधित नगरपालिका व नगरपंचायत प्रशासनाने याबाबत अद्याप कारवाई केलेली दिसत नाही. जनतेच्या हितासाठी असलेले निर्णय तत्काल अंमलबजावणीत आणताना विलंब का लावला जातो? असा प्रश्नही जनतेतून उपस्थित केला जात आहे. मुद्रक प्रकाशकांच्या नावाशिवाय अनधिकृत फ्लेक्स लावल्यास गुन्हे दाखल होतील. अशा विनापरवाना फ्लेक्सवरील झळकणारे चेहरेही सहआरोपी असतील, अशा प्रकारचा कडक आदेश जिल्हा दंडाधिकारी यांनी काढला आहे.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.