loader
Breaking News
Breaking News
Foto

असोंड नदी पुलाजवळ रस्त्याची चाळण; रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहतुकीला मोठा धोका

दापोली(प्रतिनिधी) - दापोली गावतळे असोंड फणसू उन्हवरेकडे जाणार्‍या मार्गावर असोंड हद्दीतील एका नदी च्या पुलाजवळ रस्त्यावर खड्डे पडून अक्षरशः रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावरील खड्डे वाहतुकीस अडथळा ठरत असले तरी सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्त्यातील खड्डे न बुजवता नुसतीच बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणे धोक्याचे झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील १८ गावांकडे जाणारा दापोली गावतळे असोंड फणसू उन्हवरे फरारे मार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा मार्ग आहे. या मार्गावर असोंड हद्दीतील एका नदी पुला जवळ रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे हा मार्ग सुरळीत वाहतुकीसाठी अडचणीचा ठरत आहे. अशी परिस्थिती असतानादेखील या महत्त्वाच्या मार्गावरील खड्डे बुजवून मार्ग वाहतूक योग्य करावा असे सुस्त सार्वजनिक बांधकाम विभागाला अजिबातच वाटत नाही. त्यामुळे रस्त्यातील खड्डे चुकवतच उन्हवरे १८ गाव परिसरातील लोकांना प्रवास करावा लागतो आहे.

टाईम्स स्पेशल

दापोली गावतळे असोंड फणसू उन्हवरे दरम्यानचा हा रस्ता प्रवासी वाहतूकीसाठी जेवढा महत्त्वाचा आहे तसा तो पर्यटनासाठीही महत्वाचा असा मार्ग आहे. याच मार्गावरून दापोली तालुका ठिकाणी येता येते. त्यामुळे या रस्त्याचे महत्व अधिक आहे. असे असतानाही या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून वाहतूक गणेशोत्सव काळात तरी या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून टाकण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करायला हवे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg