loader
Breaking News
Breaking News
Foto

घरेलू कामगार भांडी संचासाठी ऑनलाईन नोंदणी, मालवणातील २३५ घरेलू कामगारांना मिळणार लाभ

मालवण (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील - नोंदणीकृत घरेलू कामगारांना - संसारोपयोगी भांडी संच देण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, आज मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे मालवण तालुक्यातील २३५ पात्र घरेलू कामगारांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. नोंदणी प्रक्रियेनंतर संबंधित कामगारांना पावत्यांचे वितरण मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक ललित चव्हाण, भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव हरी चव्हाण, जिल्हा सचिव हेमंतकुमार परब, सीमा धुरी, भाग्यश्री माळकर, कल्पिता जोशी तसेच भांडी संच वाटप करणाऱ्या ठेकेदार एजन्सीचे कर्मचारी प्रवीण जाधव, रवी कदम, स्वाती आणावकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र घरेलू कामगारांना संसारोपयोगी भांडी संच मिळावा, यासाठी भारतीय मजदूर संघाने सातत्याने पाठपुरावा केला होता. संघटनेच्या मागणीनंतर तसेच आंदोलनाची हाक दिल्यानंतर ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यातील एकूण ९१६ पात्र घरेलू कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सचिव हेमंतकुमार परब यांनी दिली. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत सन २०२४ मध्ये आदेश काढून ३१ जुलै २०२४ पूर्वी नोंदणी झालेल्या पात्र घरेलू कामगारांना संसारोपयोगी भांडी संच देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये भांडी संचाचे वाटप करण्यात आले. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९१६ पात्र घरेलू कामगारांना या योजनेचा लाभमिळण्यास विलंब होत होता.

टाईम्स स्पेशल

या प्रश्नाबाबत भारतीय मजदूर संघाने कामगार मंत्री आकाश फुंडकर, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र घरेलू कामगारांना भांडी संच देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारी कामगार अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे भांडी संचासाठी पात्र घरेलू कामगारांची ऑनलाईन नोंदणी तातडीने सुरू करण्याची मागणी केली. मात्र, कार्यवाहीस विलंब होत असल्याने संघटनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा कामगार अधिकाऱ्यांनी मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून पात्र घरेलू कामगारांसाठी भांडी संचाच्या ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg