loader
Breaking News
Breaking News
Foto

झरेबांबर येथील माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांची कोकण विभाग सह संपर्क प्रमुख म्हणून निवड

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - भाजपा अनुसूचित जाती मोर्चा कोकण विभाग सहसंपर्क प्रमुखपदी माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांची निवड करण्यात आली. जाधव यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणूनही निवड झाली. भाजपा अनुसूचित जाती प्रदेश कार्यकारणी अनुसूचित जाती मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष विश्वजित गायकवाड व सरचिटणीस तथा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश प्रभारी ऍड. माधवीताई यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या सुचेनुसार आज जाहीर केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी अनुसूचित जातीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अंकुश जाधव माजी समाजकल्याण सभापती यांची निवड करण्यात आली. शिवाय त्यांच्याकडे कोकण विभाग सहसंपर्क प्रमुख पदाची ही जबादारी देण्यात आली आहे. जाधव हे आक्रमक व अभ्यासू म्हणून जिल्ह्यात परिचित आहे. समाजकल्याण सभापती म्हणून त्यांनी समाजकल्याण विभाग सक्षम करत विकासाच्या बाबतीत चर्चेत आणला होता. आजही समाजकल्याण विभागाला नवी ओळख देणारे सभापती अंकुश जाधव म्हणून सर्वसामान्य जनतेत आणि प्रशासनात त्यांची वेगळी ओळख आहे. जाधव यांच्या निवडीने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg