loader
Breaking News
Breaking News
Foto

नळपाणी योजनेसाठी ४० कोटींचा निधी मंजूर, एसटी स्थानकासाठी ५ कोटी तर मंडणगड एमआयडीसीचा प्रश्न लवकरच मार्गी: गृहराज्यमंत्री योगेश कदम

खेड (प्रतिनिधी) -मंडणगड तालुक्याच्या विकासाची जबाबदारी स्वीकारून भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकासकामे करण्यात येत आहेत. शहरासह तालुक्याला अधिक महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले. मंडणगड येथे शिवसेनेच्या वतीने दहीहंडी उत्सवानिमित्त नगरपंचायत परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी मंडणगड तालुक्याच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तालुक्यात एमआयडीसी उभारून मोठे उद्योग आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबाबत अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होती. मात्र, हा विषय केवळ चर्चेपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्षात आणण्यासाठी मागील दोन-तीन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना आता यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, तालुक्यातील पाट परिसरात एमआयडीसी उभारणीसह मोठे उद्योग येण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

मंडणगड शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन नळपाणी योजनेसाठी ४० कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. मंडणगड एसटी स्थानकाच्या विकासासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अनेक वर्षांपासून प्रवाशांकडून स्थानकातील अपुर्‍या सुविधांबाबत तक्रारी होत होत्या. आता स्वच्छतागृहांसह प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत एसटी स्थानकाचे स्वरूप बदलण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg