loader
Breaking News
Breaking News
Foto

इन्सुली पागावाडी महिला भजन मंडळाला बबन राणेंकडून भजन साहित्य भेट

बांदा (प्रतिनिधी) - कोकणातील लोकसंस्कृती, भक्तीपरंपरा आणि सण-उत्सवांची परंपरा जपण्यात महिलांचे योगदान मोलाचे आहे. हीच परंपरा पुढे नेण्यासाठी इन्सुली पागावाडी येथे नव्याने स्थापन झालेल्या महिला भजन मंडळाला सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या वतीने भजनाचे संपूर्ण साहित्य भेट देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गणेशोत्सवाच्या तोंडावर मिळालेल्या या सहकार्यामुळे महिला भजन मंडळाचा उत्साह द्विगुणित झाला आहे. यावेळी कार्यकर्ते व ग्रामस्थांशी संवाद साधताना बबन राणे म्हणाले, कोकणात गणेशोत्सव हा केवळ सण नसून आपली अस्मिता आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. गणेशोत्सवात घुमणारे भजनाचे सूर उत्सवाचे चैतन्य वाढवतात. आधुनिक युगातही पागावाडीतील भगिनींनी एकत्र येऊन भजनासारखी समृद्ध परंपरा जोपासण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे, असे सांगितले.

टाईम्स स्पेशल

महिलांना प्रोत्साहन देणे हे आपले कर्तव्य असून, भजनाच्या माध्यमातून भक्तीबरोबरच गावात एकात्मता व सकारात्मक वातावरण निर्माण होईल. मंडळाच्या पुढील वाटचालीसाठी तसेच सामाजिक उपक्रमांसाठी आपण सदैव पाठीशी राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी इन्सुली तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कृष्णा सावंत, तसेच प्रवीण मुळीक, विजया सावंत, सिद्धी सावंत, कविता सावंत, माया सावंत, गौरी सावंत, माधवी सावंत, आरती सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. साहित्य भेटीबद्दल मंडळातील महिलांनी बबन राणे यांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg