loader
Breaking News
Breaking News
Foto

“हर हर महादेव… कुणकेश्वर महाराज की जय!” अशा जयघोषात श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात आज चौथा आणि अंतिम श्रावणी सोमवार मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा

देवगड (प्रतिनिधी) - “हर हर महादेव… कुणकेश्वर महाराज की जय!” अशा जयघोषात कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात आज चौथा आणि अंतिम श्रावणी सोमवार मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. महादेवाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. पहाटे ५ वाजता श्रींच्या चरणी मान्यवरांच्या हस्ते विधिवत प्रथम पूजा संपन्न झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे OSD शशिकांत शिंदे, भारतीय नौदल अधिकारी मंगेश दळवी, प्रसिद्ध उद्योजक कणकवलीचे विशाल कामत आणि देवगडचे उद्योजक मंगेश वेतकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर महाआरती झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने आज दर्शनासाठी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विविध गावांतून आलेल्या भजनी मंडळांकडून भजन, अभंग आणि महादेवाचा जयघोष सुरू असल्याने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. दरम्यान, देवस्थान ट्रस्टच्या वतीने आज महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांना सामाजिक सेवेची ही सुवर्णसंधी असून नागरिकांनी स्वेच्छेने सहभागी होऊन तीर्थक्षेत्री सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी केले आहे. भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने भाविकांच्या सोयीची विशेष काळजी घेतली जात आहे.

टाईम्स स्पेशल

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंदिर परिसरातील विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वयंसेवकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. सायंकाळच्या सुमारास दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता असून त्यादृष्टीने आवश्यक नियोजन व करण्यात आले आहे. आजच्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कुणकेश्वर महादेवाचे दर्शन घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg