loader
Breaking News
Breaking News
Foto

केर गावातील आरोग्य सेवेला एक वर्ष पूर्ण..! वाडी-वस्तीवर पोहोचणाऱ्या आरोग्य टीमचे ग्रामस्थांनी मानले आभार

तिलारी (प्रतिनिधी) - ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या दारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘आरोग्य एक्सप्रेस – आपल्या दारी’ या मोबाईल आरोग्य सेवा प्रकल्पाला केर गावात एक वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्ताने वाडी-वस्तीवर नियमितपणे आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य टीमचे ग्रामस्थांनी आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डीएसव्ही चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सामाजिक उपक्रमांतर्गत तसेच गोवा स्वयंसेवी आरोग्य संघटनेच्या सहकार्याने हा मोबाईल आरोग्य सेवा प्रकल्प राबविण्यात येत आहे. मुख्य समन्वयक मा. विकास कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमकडून गेल्या वर्षभरापासून ही सेवा सातत्याने सुरू आहे. केर गावातील गावठणवाडी, निडलवाडी, अवाटवाडी यांसह दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना दर महिन्याला नियमितपणे मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. आरोग्य तपासणीसह आवश्यक आरोग्य मार्गदर्शन व सेवा वाडी-वस्तीवरच मिळत असल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळत आहे.

टाईम्स स्पेशल

गेल्या वर्षभरात कोणताही खंड न पडता ही सेवा सुरू ठेवल्याबद्दल ग्रामस्थांनी आरोग्य टीम, डीएसव्ही चॅरिटेबल ट्रस्ट, गोवा स्वयंसेवी आरोग्य संघटना तसेच मुख्य समन्वयक विकास कुलकर्णी यांच्याप्रती ऋण व्यक्त केले. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेली ‘आरोग्य एक्सप्रेस – आपल्या दारी’ ही सेवा यापुढेही अशीच अविरत सुरू ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली यावेळी ग्रामस्थ, महिला वर्ग, ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg