loader
Breaking News
Breaking News
Foto

रोहीत चव्हाण याचे नेत्रदिपक यश

देवगड (प्रतिनिधी) - फोंडाघाट येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन मैदानी क्रिडा स्पर्धेत देवगड तालुक्यातील पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयाच्या रोहीत संजय चव्हाण यांने नेत्रदिपक यश संपादन केले आहे. फोंडाघाट येथिल संजय आंग्रे मित्र मंडळाच्यावतीने ४ सप्टेंबर रोजी आंतर महाविद्यालयीन मैदानी क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेत रोहित चव्हाण याने उंच उडी क्रिडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याला प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याला महाविद्यालयाचे क्रिडाप्रमुख प्रा.आशय सावंत, प्रा. अक्षता मोंडकर, प्रा. सिद्धी कदम यांचे मार्गदर्शन लाभले आहे. रोहित चव्हाण यांने मिळविलेल्या नेत्रदिपक यशाबद्दल संस्थाध्यक्ष अरुण कर्ले, संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी, महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम, मानद अधिक्षक सुधीर साटम, प्राचार्य समिर तारी यांनी अभिनंदन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg