loader
Breaking News
Breaking News
Foto

नवी मुंबईचा ‘आगमनाधीश’ कामोठ्याचा विघ्नहर्ता यांचे जल्लोषात आगमन

कामोठे : अटल सेतूचा प्रवास करत ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ठेका, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि हजारो गणेशभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागात नवी मुंबईचा आगमनाधीश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामोठ्याचा विघ्नहर्ता यांचा भव्य महाआगमन सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. अटल सेतूवरून कामोठ्याच्या दिशेने विघ्नहर्ताची भव्य मिरवणूक दाखल होताच मार्गावरील वातावरण भक्तिमय झाले. गणरायाच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कामोठ्याचा विघ्नहर्ता सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महाआगमन सोहळ्यात विविध आकर्षक देखावे, ढोल-ताशा पथके, लेझीम पथक, पारंपरिक वेशभूषा आणि भक्तिमय वातावरणाने सोहळ्याची रंगत वाढवली. गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले असून, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या आगमन सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला. अटल सेतू ते कामोठे असा विघ्नहर्ताचा हा दिमाखदार प्रवास केवळ गणेशमूर्तीचे आगमन नसून, कामोठेकरांच्या श्रद्धा, एकजूट आणि गणेशभक्तीचे भव्य दर्शन ठरले. संपूर्ण कामोठे परिसरात ठिकठिकाणी गणेशभक्तांनी विघ्नहर्ताचे स्वागत केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg