loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल, खेड प्रथम

खेड, (प्रतिनिधी)- खेड येथील एम आई बी. गर्ल्स हायस्कूलमध्ये आयोजित तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल, खेड या विद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या नाट्य स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कलाकार म्हणून चिरंजीव प्रणव राजेंद्र बेलोसे याच्या मानव या भूमिकेला उत्कृष्ट बाल अभिनेता म्हणून प्रथम पारितोषिकाने गौरविण्यात आले. या स्पर्धेत तालुक्यातील एकूण अकरा शाळांनी सहभाग घेतला होता. महासागरांचे पुनरुज्जीवन यावर आधारित विज्ञान नाटिका हॅशटॅग आईसाठी असे या नाटिकेचे नाव असून,या नाटिकेच्या माध्यमातून, महासागराचे होणारे प्रदूषण, त्याचे सजीव सृष्टी वर होणारे दुष्परिणाम, व त्यावर उपाययोजना, या सामाजिक विषयांवर आधारित विज्ञान नाटिका सादर करण्यात आली. या नाटिकेतील सहभागी कलाकारांनी संपूर्ण सभागृहातील प्रेक्षकांच्या मनावर आपल्या कलागुणांनी अधिराज्य गाजवत सर्वांची मने जिंकली. या यशामुळे श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण कार्याची पुन्हा एकदा प्रचिती आली असून, पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यालयाच्या संघाला शुभेच्छा देण्यात येत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg