loader
Breaking News
Breaking News
Foto

मौजे तेर्ये तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सुनिल दळवी यांची फेरनिवड

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - ​मौजे तेर्ये ग्रामपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये गावचे प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते सुनिल दौलत दळवी यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सलग चौथ्या वर्षी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. ​गेल्या तीन वर्षांत त्यांनी गावात शांतता, सुव्यवस्था व सलोखा राखण्यासाठी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ग्रामस्थांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा अध्यक्षपदाची ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. बुरंबी येथील श्री वाघजाई ग्रामदेवता मंदिरात ही ग्रामसभा अत्यंत उत्साहात व शांततेत पार पडली. या सभेमध्ये अध्यक्षपदासोबतच उपाध्यक्षांसह एकूण ३३ सदस्यांची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. उपाध्यक्षपदी सौ. साक्षी शशांक शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​सुनिल दळवी यांनी आपल्या गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात ग्रामस्तरावर निर्माण होणारे आपापसातील वाद, तंटे व गैरसमज न्यायालयात किंवा पोलिसांत जाऊ न देता सामोपचाराने व गावातच मिटवण्यात मोठे यश मिळवले. त्यांनी अत्यंत निष्पक्षपणे आणि सामाजिक बांधिलकी जपून केलेले काम कौतुकास्पद ठरले आहे. त्यांच्या याच तीन वर्षांच्या यशस्वी कार्यप्रणालीमुळे आणि ग्रामस्थांच्या अखंड विश्वासामुळे त्यांनी अध्यक्षपदाची 'हॅटट्रिक' साधत सलग चौथ्या वर्षी बिनविरोध निवडून येण्याचा मान मिळवला आहे. या प्रसंगी ग्रामसेवक प्रशांत शेट्ये, सरपंच दुर्वा भुरवणे, मुख्य मानकरी प्रकाश दळवी, माजी सरपंच संदीप भुरवणे, युवा नेतृत्व सतीश पवार, तसेच पंचायत समिती सदस्या आरुषी आनंद घवाळी यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष सुनिल दळवी व उपाध्यक्ष साक्षी शिंदे यांच्यासह सर्व ३३ सदस्यांचे उपस्थित मान्यवरांनी व ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

सुनिल दौलत दळवी व साक्षी शशांक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवीन समितीत दुर्वा मयुर भुरवणे, प्रचित पांडुरंग मोहिते, संपदा सुनीलदत्त जोशी, भरत दौलत दळवी, आनंद तुकाराम घवाळी, संदिप बाळ भुरवणे, मनोज किशोर लोहिया, नरेश पांडुरंग शेळके, सूर्यकांत तानाजी घवाळी, प्रियंका प्रकाश गेल्ये, सतीश नामदेव पवार, अशोक गंगाराम मोहिते, आदित्य अशोक गावडे, अजित रामचंद्र मोहिते, प्रभाकर रत्ना मोहिते, रमेश नारायण भुरवणे, शरद गोविंद बाईत, नंदिनी संजय मोहिते, अजय लक्ष्मण भुरवणे, शशांक गणपत शिंदे, दिलीप दौलत दळवी, प्रकाश सिताराम दळवी, बाबू धोंडू भुरवणे, तनुजा उदय भुरवणे, विलास विजय भरणकर, संजय गोविंद गेल्ये, विनय मनवर, उदय रामचंद्र भुरवणे, प्रशांत पांडुरंग शेट्ये, सुश्रीता अशोक कांबळे आणि मनोज शिंदे यांचा समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg