रत्नागिरी : दहीकाला अर्थातच गोपाळकाल्याच्या उत्साहात आज रत्नागिरी शहरात दहीहंडीचा थरार रंगणार आहे. शहराच्या विविध भागांत राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि मंडळांच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून, दुपारी तीननंतर शहरात गोविंदांच्या जल्लोषासोबतच दहीहंडी पाहण्यासाठी मोठी गर्दी होणार, हे निश्चित! गाडीतळ परिसरात मनसेच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच साळवी स्टॉप येथे मोटर मालक असोसिएशनची दहीहंडी, तर तेलीआळी नाका येथे नगरसेवक केतन शेट्ये यांच्या पुढाकाराने दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे.
स्टँडच्या खालील बाजूस हॉकर असोसिएशनची दहीहंडी रंगणार आहे. त्याचबरोबर एकता मित्र मंडळ, नवलाई मित्र मंडळ आणि बाजारपेठ परिसरातील विविध मंडळांच्या दहीहंड्याही आज फुटणार आहेत. त्यामुळे शहरातील प्रत्येक प्रमुख भागात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेली पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारी दहीहंडी यंदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवात या कार्यक्रमाची उणीव जाणवणार असली तरी शहरातील इतर दहीहंड्यांमुळे उत्साह कायम राहणार आहे.
राजकीय पक्षांच्या दहीहंड्या, विविध मंडळांचा उत्साह, गोविंदा पथकांचे थर आणि ढोल-ताशांचा गजर यामुळे रत्नागिरी शहर आज अक्षरशः ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषाने दुमदुमणार आहे. दुपारी तीननंतर दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमांना वेग येणार असून, कोणाची दहीहंडी किती उंच जाते आणि कोणते गोविंदा पथक बाजी मारते, याकडे रत्नागिरीकरांचे लक्ष लागले आहे.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.