खेड - सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत ग्रामीण भागातील गरजू घटकांसाठी आशेचा किरण ठरलेले समाजसेवक महेश मनोहर चव्हाण यांना ’बी द चेंज फाउंडेशन’च्या वतीने अत्यंत प्रतिष्ठेचा ’महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले. ६ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातून येणार्या अत्यंत गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारादरम्यान मोलाची मदत करणे, वंचित आणि गरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाची वाट सुकर करणे आणि ग्रामीण भागातील विविध विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणे, अशा त्यांच्या बहुआयामी आणि निस्वार्थी कार्याची दखल घेऊन फाउंडेशनने त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
महेश चव्हाण हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी केवळ नोकरी किंवा व्यवसाय न मानता या क्षेत्राकडे समाजसेवेचे माध्यम म्हणून पाहिले आहे. ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना पैशांअभावी किंवा योग्य मार्गदर्शनाअभावी वेळेवर उपचार मिळत नाहीत. अशा वेळी धावून जाणारे हक्काचे व्यक्तिमत्त्व म्हणजे महेश चव्हाण. गंभीर आजारांशी झुंजणार्या गरीब रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापासून ते त्यांच्या औषधोपचाराची आणि सवलतींची व्यवस्था करेपर्यंत ते स्वतः अहोरात्र झटत असतात. आजवर शेकडो रुग्णांना त्यांच्या संवेदनशीलतेमुळे आणि तत्परतेमुळे पुनर्जन्म मिळाला आहे. केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे, तर शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त हेतूने ते दरवर्षी विद्यार्थी-विद्यार्थिनींना वह्या, पुस्तके, दप्तरे आणि इतर शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करतात. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक गरीब कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाला मोठी मदत झाली असून, ग्रामीण भागात शिक्षणाची गोडी निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
आपल्या ग्रामीण भागाचा कायापालट व्हावा, तेथील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी महेश चव्हाण नेहमीच आग्रही असतात. ’बी द चेंज फाउंडेशन’च्या वतीने आयोजित या पुरस्कार सोहळ्याला ब्रिगेडियर सुनील मोहोड, अभिनेत्री, निवेदिता पगार सामाजिक, राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्यांच्यासाठी मला काम करण्याची संधी मिळाली. ’बी द चेंज फाउंडेशन’ने माझ्या कामाची दखल घेऊन माझी जबाबदारी आणखी वाढवली आहे. भविष्यातही हे सामाजिक आणि वैद्यकीय कार्य अधिक जोमाने आणि व्यापक स्वरूपात सुरू राहील.त्यांच्या मूळ गावी आणि ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण पसरले असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. सामाजिक बांधिलकी जपत समाजातील वंचितांच्या आयुष्यात प्रकाशाचा किरण निर्माण करणार्या महेश चव्हाण यांचे हे कार्य समाजातील इतर तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.