loader
Breaking News
Breaking News
Foto

मोपा परिसरात ओंकार हत्तीचा पुन्हा धुडगूस; बागायतींचे नुकसान, शेतकर्‍यांमध्ये चिंता

बांदा, (प्रतिनिधी) -गोवा-सिंधुदुर्ग सीमाभागात वावरणारा ‘ओंकार’ हत्ती कास परिसरात दाखल झाला आहे. काल तांबोशे-मोपा परिसरात बागायतींमध्ये फिरून नुकसान केल्यानंतर ओंकारने कासच्या दिशेने आगेकूच केली. सकाळच्या सुमारास तो कास येथे दाखल झाल्याची माहिती मिळताच परिसरातील शेतकर्‍यांमध्ये पुन्हा चिंता निर्माण झाली आहे. तांबोशे-मोपा परिसरातील बागायतींमध्ये ओंकारने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची माहिती मिळत असून, कास परिसरातही त्याच्या वावरामुळे बागायतींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करण्यात येत असून, नुकसानीचा नेमका अंदाज त्यानंतर स्पष्ट होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, ओंकार कास परिसरात दाखल झाल्याची माहिती मिळताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. अनेकजण मोबाईलमध्ये हत्तीचे फोटो व व्हिडिओ काढण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. हत्तीच्या जवळ न जाता सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.ओंकारच्या सततच्या वावरामुळे कास, तांबोशे-मोपा परिसरातील शेतकरी व बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बागायतींचे नुकसान होत असल्याने वनविभागाने हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून शेतकर्‍यांच्या नुकसानीची तातडीने पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg