loader
Breaking News
Breaking News
Foto

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गैरवर्तन, दापोलीत दोन गुन्हे

दापोली, (वार्ताहर): दापोली तालुक्यातील अल्पवयीन मुलींशी अतिप्रसंग आणि गैरवर्तन केल्याच्या दोन भिन्न तक्रारी दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या असून २ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील एका १६ वर्षे ११ महिने २५ दिवस वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीशी संशयीत अदनान लियाकत कोळथरकर (वय ४०) याने ओळख करून घेतली व तिच्याशी फेब्रुवारी २०२६ ते १८.०८.२६ या कालावधीत ही मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार पीडित मुलीच्या नातेवाईक यांनी दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या तक्रारीवरून संशयित अदनान लियाकत कोळथरकर याचे विरोधात दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४(१),(२) व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाच्या कलम ४,६,८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक ज्योती चव्हाण करत आहेत. दुसर्‍या प्रकरणात ८ वर्षे ४ महिने वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीशी १ सप्टेंबर २६ रोजी सायंकाळी ७.३० चे सुमारास घरी कोणी नसल्याचे पाहून व ती बेडवर एकटीच अभ्यास करत असताना संशयित प्रमोद भिकू लोवरे यांनी तेथे येऊन तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची तक्रार पीडित मुलीच्या नातेवाईक यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली आहे. संशयित प्रमोद भिकू लोवरे याच्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात भारतीत न्याय संहितेच्या कलम ७५(२) व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाच्या कलम ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg