दापोली (सागर गोवळे) : ग्रामीण कृषी अनुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत कृषी सखी गटामार्फत वनोशी तर्फे पंचनदी (धातोंडी वाडी) येथील शेतकरी लक्ष्मण उजल आणि अरुण उजल यांच्या शेतावर 'अझोल्ला उत्पादन तळ्याची उभारणी' या विषयावर प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या संपन्न झाले. जनावरांसाठी अत्यंत पौष्टिक आणि पूरक खाद्य असलेल्या अझोल्लाचे महत्त्व गावकऱ्यांना पटवून देणे आणि त्याच्या निर्मितीचे प्रत्यक्ष ज्ञान देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
प्रात्यक्षिकादरम्यान ६ फूट लांब, ३ फूट रुंद आणि १ फूट खोल खड्डा खोदून त्यात ताडपत्री अंथरण्यात आली व बाजू मातीने पॅक करून पाणी गळती बंद करण्यात आली. यानंतर तळ्यात ७ ते ८ इंच स्वच्छ पाणी भरून त्यात ३ किलो शेण, ३ किलो माती आणि ३० ग्रॅम एसएसपी खताची स्लरी मिसळण्यात आली. पाणी स्थिर झाल्यावर अझोल्लाचे बीज (कल्चर) सोडण्यात आले. हे तळे गोठ्याशेजारीच उभारण्यात आल्याने शेतकऱ्यांना दररोज जनावरांना ताजे अझोल्ला देणे सहज शक्य होणार आहे. अझोल्लामध्ये प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. पशुखाद्यात अझोल्लाचा वापर केल्याने: इतर खाद्यावरील खर्चात २० ते २५% बचत होते. दुध उत्पादनात १० ते १५% वाढ होते. शेतात याचा वापर जैवखत आणि हिरवळीचे खत म्हणूनही करता येतो. अझोल्लाच्या चांगल्या वाढीसाठी योग्य पाणी व्यवस्थापन गरजेचे आहे. पहिल्या कापणीनंतर २० ते ३० टक्के पाणी बदलावे आणि ३ ते ४ कापण्यांनंतर संपूर्ण पाणी बदलून पुन्हा नवीन स्लरी टाकावी, असे मार्गदर्शन या वेळी करण्यात आले.
हे प्रात्यक्षिक सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुंकरकर, RAWE समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रभारी डॉ. विजय देसाई, विषय तज्ञ डॉ. नरेंद्र प्रसादे आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण, डॉ. प्रवीण झगडे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या प्रात्यक्षिकाला गावातील ११ ग्रामस्थ उपस्थित होते. कमी खर्चात पौष्टिक पशुखाद्य कसे तयार करावे, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक मिळाल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.