loader
Breaking News
Breaking News
Foto

हर्णे एस.टी. बसस्थानक आवारात पडलेल्या खड्डयांचा डोह बुजवण्यास एस.टी. प्रशासनाला विसर

दापोली (प्रतिनिधी) : हर्णे एस.टी.बस स्थानक आवारात पडलेल्या खड्ड्यांमुळे पाण्याचा डोह तयार झालेला आहे. प्रवाशांना त्रास होणारा हा पाण्याचा तयार झालेला डोह बुजवून टाकण्यास एसटी प्रशासन लक्ष देत नाही त्यामुळे हर्णे एस. टी.स्टॅडमध्ये येण्यास प्रवाशांना धोक्याचे झाले आहे. दापोली तालुक्यातील हर्णे येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे एक एस.टी. बसस्थानक आहे. या बस स्थानकात प्रवेश केल्याची नोंद करुनच हर्णे येथील या एस. टी. बस स्थानकातूनच पुढे पाजपंढरी, आंजर्ले, आडे, उटंबर, केळशी, मांदिवलीकडे जाणार्‍या एस.टी. बसेस सोडल्या जातात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसे पाळंदे, सालदुरे, आंबवली खुर्द, आसुद, वणंद मार्गे गिम्हवणे दापोली येथे बस मार्गस्थ होतात. हर्णे पाजपंढरी ही गावे लोकसंख्येच्या मानाने खुपच मोठी गावे आहेत. त्यात हर्णे ही एक व्यापारी बाजारपेठ आहे. तसेच मासेमारी बंदर देखील आहे. शिवाय हर्णे येथे सुवर्णदुर्ग या पाण्यातील किल्ल्यासह कनकदुर्ग, फत्तेगड तसेच गोवा हे ऐतिहासिक वारसा असलेले महत्त्वाचे किल्ले आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी स्थानिक, दापोली तालुक्यातील पर्यटक, प्रवाशी, येथे एस. टी. बसेसनेच ये-जा करत असतात. तसे हर्णे पाजपंढरीसह अडखळ, म्हैसोंडे, वाघवे या हर्णे जवळील गावातील शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणारे विदयार्थी असतील वा प्रवासी असतील त्यांना हर्णे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एस.टी. बस स्थानकात येवूनच प्रवास करतात.

टाईम्स स्पेशल

अशातच बस स्थानक आवारात पडलेल्या भल्या मोठ्या महाकाय अशा खड्ड्यात पाणी साठून डोह तयार झाल्याने या डोहाचा प्रवाशांना मोठाच त्रास सहन करावा लागतो आहे. प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी जशी एस.टी. बस महत्वाची तसे हर्णे बस स्थानकातील परिसर हा प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. मात्र येथील आवारात पडलेल्या खड्डयांमध्ये पावसाचे गढूळ पाणी साचून पाण्याचे डोह तयार झाले आहेत ते प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी धोक्याचे ठरत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg