loader
Breaking News
Breaking News
Foto

अति उत्कृष्ट सेवा पदकाबद्दल पोलीस निरीक्षक ‘निळकंठ बगळे’ यांचा निवसर ग्रामस्थांकडून सन्मान

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर): लांजा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांना नुकतेच अति उत्कृष्ट सेवा पदकाने गौरविण्यात आले होते. या अतीउत्कृष्ट सेवा पदकाबद्दल पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांचा निवसर ग्रामस्थांकडून लांजा पोलीस ठाणे येथे सन्मान करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नुकतेच १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांना अति उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. कर्तव्याप्रती असलेली निष्ठा, निष्कलंक सेवा आणि आदर्श कार्यपद्धती याबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गौरवाची दखल घेत निवसर ग्रामस्थांनी लांजा पोलीस ठाणे येथे निळकंठ बगळे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. यावेळी त्यांच्या कार्याचे कौतुक करत ग्रामस्थांनी पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. तर नुकतीच पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झालेल्या संजय मारळकर यांचाही यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच महिला हेडकॉन्स्टेबल जान्हवी मांजरे यांच्या कामाचे कौतुक करत त्यांचाही सन्मान करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, यावेळी रवळनाथ सोसायटीचे चेअरमन तथा माजी सरपंच अल्ताफ काझी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष विवेक कांबळे, उपसरपंच इमरान पावसकर, तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत शिंदे, उपाध्यक्ष विशाल शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य आशफाक पावसकर यांच्यासह राजेंद्र शिंदे, राजेश कांबळे, अख्तर सागवेकर, रवींद्र घाटकर, एकनाथ आग्रे, दत्ताराम मेस्त्री, संतोष धाडवे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg