चिपळूण (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी व गणेशभक्त मुंबईसह विविध भागांतून आपल्या गावी दाखल होत आहेत. या काळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी आणि प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी चिपळूण येथील सुरू असलेल्या पुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी, अभियंते व कर्मचारी उपस्थित होते. पुलाच्या कामाची सद्यस्थिती, वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला मार्ग, सुरू असलेल्या बांधकामामुळे निर्माण होणार्या संभाव्य अडचणी तसेच गणेशोत्सवाच्या काळात वाढणारी वाहनांची संख्या याबाबत आमदार सामंत यांनी अधिकार्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच राज्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात येतात. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत पुलाचे काम सुरू असल्याने वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना आमदार सामंत यांनी अधिकार्यांना दिल्या. गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्या चाकरमान्यांना आणि स्थानिक नागरिकांना वाहतुकीचा कोणताही त्रास होता कामा नये. पुलाचे काम सुरू असले तरी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी योग्य नियोजन करावे. आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक नियमन, दिशादर्शक फलक आणि सुरक्षेच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशा सूचना आमदार किरण सामंत यांनी यावेळी दिल्या.
तसेच पुलाच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, गर्दीच्या काळात आवश्यकतेनुसार वाहतूक व्यवस्थेत बदल करावेत आणि वाहनचालकांना योग्य मार्गदर्शन मिळेल याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात येणार्या चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि विनाअडथळा व्हावा, यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणार्या उपाययोजनांचा आमदार सामंत यांनी यावेळी आढावा घेतला. पुलाचे काम दर्जेदार पद्धतीने आणि वाहतुकीचे नियोजन कायम ठेवून पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. आमदार किरण सामंत यांच्या या पाहणीमुळे गणेशोत्सवाच्या काळातील वाहतूक व्यवस्थेबाबत प्रशासन अधिक सतर्क झाले असून, चाकरमानी आणि स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे.











































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.