संगमेश्वर (सत्यवान विचारे) : उत्सवाचा आनंद मोठा की संकटात सापडलेल्या माणसाच्या मदतीला धावून जाणे मोठे? याचे उत्तर देवरूखजवळील साडवली येथील सह्याद्रीनगर मित्र मंडळाने आपल्या कृतीतून दिले आहे. दरवर्षी उत्साहात साजरी होणारी दहीहंडी यंदा रद्द करून त्यासाठी जमा झालेला निधी गवा रेड्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या स्थानिक तरुणाच्या उपचारासाठी देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या निर्णयातून ‘उत्सवापेक्षा माणुसकी मोठी’ हा संदेश समाजासमोर आला आहे. शुक्रवारी आंबव येथे गवा रेड्याने साडवली येथील रहिवासी स्वप्नील पेंडामकर या तरुणावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात स्वप्नील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या उपचारासाठी मोठ्या आर्थिक मदतीची आवश्यकता असताना सह्याद्रीनगर मित्र मंडळाने पुढाकार घेत त्याला आधार देण्याचा निर्णय घेतला.
स्वप्नीलवर ओढवलेल्या संकटाची माहिती मिळताच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने बैठक घेतली. यंदाची दहीहंडी साजरी न करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. दहीहंडी, डीजे, सजावट आणि इतर उत्सवावरील खर्चाला फाटा देत दहीहंडीसाठी जमा झालेला संपूर्ण निधी स्वप्नीलच्या उपचारासाठी सुपूर्द करण्यात आला. हा निर्णय केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून, संकटाच्या काळात समाजाने आपल्या बांधवांच्या पाठीशी कसे उभे राहावे, याचे उत्तम उदाहरण ठरला आहे.सह्याद्रीनगर मित्र मंडळाच्या या निर्णयाचे साडवली, देवरूख आणि परिसरातून कौतुक होत आहे. उत्सव हे आनंदाचे माध्यम असले, तरी एखादा आपला माणूस संकटात असताना त्याच्या मदतीला धावून जाणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे मंडळाने कृतीतून दाखवून दिले.
आजच्या काळात उत्सवांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असताना, त्याच उत्सवाचा निधी एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी वापरण्याचा हा आदर्श निर्णय निश्चितच इतर मंडळांसाठी आणि समाजासाठी प्रेरणादायी आहे. संकटग्रस्ताला मदतीचा हात देणे, त्याच्या दुःखात सहभागी होणे आणि ‘आपला माणूस’ म्हणून त्याच्या उपचारासाठी उभे राहणेहीच खरी संस्कृती, हीच खरी माणुसकी आणि हाच खर्या अर्थाने उत्सव! स्वप्नील पेंडामकर यांची प्रकृती लवकर सुधारावी आणि ते सुखरूप घरी परतावेत, यासाठी परिसरातून प्रार्थना केली जात आहे. तसेच सह्याद्रीनगर मित्र मंडळाच्या या संवेदनशील आणि अनुकरणीय निर्णयाला मनापासून सलाम केला जात आहे.








































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.