loader
Breaking News
Breaking News
Foto

एनसीएमसी कार्डमुळे प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी लागू करण्यात आलेल्या एनसीएमसी कार्डला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने प्रवासी आणि वाहक यांच्यात वादाचे प्रकार वाढत आहेत. एनसीएमसी कार्डमध्ये सुरुवातीपासूनच तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने त्याचा थेट परिणाम एसटीच्या दैनंदिन प्रवास करणार्‍या प्रवाशांवर होत आहे. ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी असलेल्या या कार्डमध्ये रिचार्ज केल्यानंतर त्यामधील बॅलन्सची माहिती जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना हेलपाटे मारावे लागत आहेत. कार्डमध्ये रिचार्ज केल्यानंतरही बॅलन्स न दिसणे, कार्ड स्वीकारले न जाणे अथवा व्यवहारामध्ये अडचणी येणे, अशा समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे प्रवासी आणि वाहकांमध्ये शाब्दिक वाद होण्याचे प्रकार वाढले आहेत. एनसीएमसी कार्ड योजनेतील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून प्रवाशांना तसेच वाहकांना होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg