खेड(प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने प्रसिद्ध कर सल्लागार तथा लायन रत्नाकरजी शीलेवंत यांच्या वाढदिवसानिमित्त नवभारत हायस्कूल, भरणे येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जिन्नस व खाऊचे वाटप करून वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना लायन रत्नाकरजी शीलेवंत यांनी आपल्या वसतिगृहातील जीवनातील अनुभवांना उजाळा देत, वसतिगृहातील जीवन मी स्वतः अनुभवलेले असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांची मानसिकता आणि त्यांच्या अडचणी मला चांगल्या प्रकारे माहीत आहेत, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड मनात न बाळगता, ‘मी देखील आदर्श व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तींप्रमाणेच यशस्वी होऊ शकतो,’ असा आत्मविश्वास मनात ठेवावा. परिस्थिती कोणतीही असली तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जीवनात मोठे यश संपादन करता येते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
विद्यार्थ्यांना जिन्नस व खाऊची भेट देण्यामागील भावना व्यक्त करताना लायन रत्नाकरजी शीलेवंत म्हणाले, ही तुमच्यासाठी मदत नसून तुमच्यासोबत आनंद वाटण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. तुमच्या चेहर्यावर उमटलेला आनंद आणि तुमच्या डोळ्यांतील चमक हीच माझ्या वाढदिवसानिमित्त मला मिळालेली सर्वात मोठी भेट आहे. यावेळी लायन रोहन विचारे यांनी सांगितले की, लायन्स क्लबच्या वतीने वसतिगृहातील विद्यार्थ्यांसमवेत आदर्श व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तींचे वाढदिवस साजरे करण्यामागे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे हा मुख्य उद्देश आहे. लायन्स क्लब चे सचिव उत्तम कांबळे सर यांनी आज वसतिगृहात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांमध्ये उद्याचे डॉक्टर, शिक्षक, अधिकारी, उद्योजक आणि समाजसेवक घडण्याची क्षमता आहे. त्यांना प्रेम, प्रोत्साहन आणि योग्य मार्गदर्शन मिळाले, तर ते निश्चितच आपल्या कुटुंबाचे, शाळेचे आणि समाजाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. वाढदिवसाचा आनंद सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्याचा लायन्स क्लबचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. या कार्यक्रमास लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे सचिव ला. उत्तम कांबळे, ला. डॉ. ज्ञानेश्वर मरकड, ला. सागर चिखले, वसतिगृह व्यवस्थापक श्री. जानकर, शिक्षक तसेच वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.








































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.