loader
Breaking News
Breaking News
Foto

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वतःहून भेट घेत संवाद साधला. हा क्षण आपल्यासाठी दुग्धशर्करा योग : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अरविंद मोंडकर

मालवण दि प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नाशिक येथे नुकत्याच झालेल्या राज्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्षांसाठीच्या दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराला कौटुंबिक संवादाची भावनिक किनार लाभली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांची स्वतःहून भेट घेत संवाद साधला. हा क्षण आपल्यासाठी दुग्धशर्करा योग असल्याची भावना सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद नामदेव मोंडकर यांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

“राहुल गांधी यांच्यासोबत राजकीय जीवनात अनेकदा भेट झाली आहे. मात्र, नाशिक येथील भेट विशेष महत्त्वाची होती. कारण ही भेट परिवारासोबतची आपुलकीची होती. राहुलजींच्या भेटीत एक जिव्हाळा आणि आपलेपणा होता. हा क्षण आमच्यासाठी भावनिक होता,” असे मोंडकर यांनी सांगितले.महाराष्ट्रातील काँग्रेस जिल्हाध्यक्षांसाठी आयोजित या दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, बंटी पाटील, विश्वजित कदम यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. गांधी विचार, संविधानिक मूल्ये आणि सामान्य माणसाच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा या शिबिरातून मिळाल्याचे मोंडकर यांनी सांगितले. शिबिरात सहभागी झाल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले.

टाइम्स स्पेशल

यावेळी बोलताना श्री अरविंद मोंडकर यांनी हे माझ्या राजकीय प्रवासातील सातवे प्रशिक्षण शिबिर होते. मात्र, हे शिबिर कायम विशेष राहील. कारण आम्हा सर्व जिल्हाध्यक्षांच्या परिवाराशी संवाद साधण्याची इच्छा राहुल गांधी यांनी स्वतःहून व्यक्त केली. त्यांनी दिवसभर आमच्याशी आणि परिवारातील सदस्यांशी संवाद साधला,” असेही मोंडकर म्हणाले.या दहा दिवसांच्या शिबिरामुळे राज्यातील विविध जिल्हाध्यक्षांशी परिचय वाढला असून, एक कौटुंबिक वातावरण निर्माण झाले. संघटनात्मक कामासाठी नवी ऊर्जा, आत्मविश्वास आणि प्रेरणा या शिबिरातून मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे मोंडकर यांनी आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg