loader
Breaking News
Breaking News
Foto

जुनी पेन्शन नाकारल्याच्या निषेधार्थ न्यू इंग्लिश स्कूल तुंबाड येथील शिक्षकांचे काळ्या फिती लावून काम

तुंबाड, खेड (प्रतिनिधी) : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्ती आणि टप्पा अनुदान २००५ पूर्वीचे असतानाही, केवळ १००% अनुदान २००५ नंतर मिळाले या कारणाने महाराष्ट्रातील खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना नाकारणार्‍या शासन निर्णयाच्या निषेधार्थ न्यू इंग्लिश स्कूल तुंबाड, ता. खेड, जि. रत्नागिरी येथील शिक्षकांनी अनोखे आंदोलन केले. दि. १ सप्टेंबर ते ४ सप्टेंबर या कालावधीत शाळेतील शिक्षकांनी शासनाचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून अध्यापनाचे काम केले. शिक्षकांचे म्हणणे आहे की, नियुक्ती आणि अनुदानाचा टप्पा २००५ पूर्वीचा असताना केवळ १००% अनुदान उशिरा मिळाले म्हणून जुनी पेन्शन नाकारणे हा अन्याय आहे. शासनाने तातडीने हा निर्णय मागे घेऊन १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनामुळे खेड तालुक्यातील शिक्षक वर्तुळात शासनाच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg