loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगड हायस्कूलला देणगी प्राप्त!

देवगड(प्रतिनिधी)- देवगड येथील शेठ म.ग. हायस्कूल या शाळेला माजी विद्यार्थी रतिकांत दगडू परब यांनी रुपये ११०००/- ची देणगी दिली. परब हे १९७५ बॅचचे माजी विद्यार्थी असून विशेष म्हणजे त्यावर्षी झालेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये देवगड केंद्रामध्ये ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले होते. सध्या त्यांचे वास्तव्य मुंबई या ठिकाणी असून देवगड तारामुंबरी हे त्यांचे मूळ गाव आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी माजी मुख्याध्यापक व माजी विद्यार्थी संघाचे सल्लागार चंद्रकांत शिंगाडे, मुख्याध्यापक प्रविण खडपकर, माजी विद्यार्थी संघाचे कोषाध्यक्ष व शाळेचे वरिष्ठ लिपीक शशांक साटम उपस्थित होते. शाळेतर्फे व संस्थेतर्फे गुलाब पुष्प व आभार पत्र देऊन परब यांचा सन्मान करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg