loader
Breaking News
Breaking News
Foto

बँक ऑफ इंडियाचा १२१ वा वर्धापनदिन लांजा शाखेत उत्साहात

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - बँक ऑफ इंडिया या बँकेचा १२१ वा वर्धापनदिन लांजा शाखेत उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनी कार्यक्रमात बचत गटांना कर्ज, होम लोन, गोल्ड लोन, गाडी लोन, मुद्रा लोन, शेती कर्ज सर्व मिळून एप्रिल २०२६ ते आजपर्यंत १८ करोड कर्ज वाटप करण्यात आले आहे. तसेच बँकेच्या वेगवेगळ्या योजना आणि होत असलेला फायदा याविषयी खातेदार यांना मार्गदर्शन करण्यात आले. १२१ वर्षाचा विश्वास आणि खातेदार यांची मिळालेली साथ यामुळे बँकेने नावलौकिक मिळविला असल्याचे सांगितले. रत्नागिरी व सिधुदुर्ग जिल्यातील लांजा शाखा ही पहिली असून लांजा शाखेलाही ५६ वर्ष झाली आहेत. लांजा शाखेत झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाप्रसंगी बँकेचे व्यवस्थापक ब्रम्हया इस्तरला, सर्व कर्मचारी, बचत गटाच्या महीला खातेदार उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg