loader
Breaking News
Breaking News
Foto

देवांग चव्हाणची विभागस्तरीय वूशु स्पर्धेसाठी निवड

मालवण, (प्रतिनिधी) - भंडारी ए. सो. हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय, मालवणच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखत इयत्ता बारावी कॉमर्सचा विद्यार्थी देवांग चव्हाण याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२६-२७ मधील अंडर-१९ वूशु क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत देवांगची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देवगड तालुक्यातील कुणकेश्वर हायस्कूल येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देवांगने जिद्द, मेहनत, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट क्रीडा कौशल्याच्या जोरावर प्रभावी कामगिरी बजावली. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर त्याने विभागस्तरीय स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले.

टाईम्स स्पेशल

देवांगच्या या यशामुळे भंडारी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मालवणच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एका मानाच्या तुऱ्याची भर पडली आहे. त्याच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर तसेच सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी देवांगचे अभिनंदन केले आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg