loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - मुंबई या ठिकाणी असलेले दोडामार्ग तालुक्यातील तसेच बांदा परिसरातील चाकरमानी हे सावंतवाडी येथील रेल्वे स्थानक या ठिकाणी उतरतात पण दोडामार्ग या ठिकाणी जाण्यासाठी थेट एसटी बससेवा उपलब्ध नाही. यामुळे चाकरमानी यांची गैरसोय होते यासाठी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस ते दोडामार्ग बस सेवा सुरू करावी, अशी मागणी ठाकरे सेना पदाधिकारी बाबुराव धुरी यांनी केली होती. या हि मागणी मान्य करत १२ ते १३ सप्टेंबर दरम्यान सावंतवाडी रेल्वे टर्मिनस ते दोडामार्ग तीन फेऱ्या सोडल्या जाणार आहेत. यामुळे चाकरमानी याना दिलासा मिळाला आहे. बाबुराव धुरी यांच्या मागणीला यश आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग तालुक्यातील अनेक जणांना थीवीम रेल्वे स्थानक जवळ असले तरी या ठिकाणी काही जणांना लाभ होतो. पण बांदा, तळकट, कोलझर, कळणे, आडाळी, मोरगाव, कुंब्रल, बांदा परिसरातील गावातील चाकरमानी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस या ठिकाणी उतरतात. व सावंतवाडी बस स्थानक किंवा खाजगी वाहने करावी लागतात. ही गैरसोय दूर करण्यासाठी शिवसेना ठाकरे पदाधिकारी बाबुराव धुरी यांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस ते दोडामार्ग बससेवा चतुर्थी दरम्यान सुरू करावी, अशी मागणी केली होती.

टाईम्स स्पेशल

सिंधुदुर्ग जिल्हा राज्य परिवहन विभागीय अधिकारी तसेच सावंतवाडी आगार यांनी दखल घेऊन सावंतवाडी रेल्वे टर्मिनस ते दोडामार्ग बस सेवा सुरू करायला तयारी दाखवली १२ व १३ सप्टेंबर दोन दिवस सकाळी, 11.30 वाजता, दुपारी 2.30 वाजता, सायंकाळी 5.30 वाजता या वेळेत बसेस सोडल्या जाणार आहेत. तेव्हा दोडामार्ग बांदा परिसरातील चाकरमानी यांची सोय झाली आहे. चाकरमानी यांनी या एस टी बसचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाबुराव धुरी यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg