loader
Breaking News
Breaking News
Foto

जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत गोपाळकाला उत्साहात

गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. "गोविंदा रे गोपाळा " गोविंदा गोपाळा " जयघोष करीत भक्तिमय वातावरणातआनंदात जल्लोषात दहीहंडी जि.प.पूर्ण प्राथमिक मराठी शाळा मेर्वी शाळेतील विद्यार्थ्यांनी फोडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक हिदायत भाटकर, विषय शिक्षिका शर्वरी करगुटकर, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, उपशिक्षिका भारती तायशेटये, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिलिंद चंदूरकर, शिक्षणतज्ञ मंगेश म्हादये, सिद्धार्थ पावसकर, निशांत गोठणकर, रचित म्हादये, अंगणवाडी शिक्षिका सुनिता मेस्त्री, मदतनीस आकांक्षा गुरव आदिंनी बहुमोल परिश्रम घेतले.

टाईम्स स्पेशल

आज मेर्वी शाळेने दहीकाला साजरा करीत आपली भारतीय संस्कृतीची मूल्ये संवर्धन करण्याचे अतिशय स्तुत्य उपक्रम राबविल्याबददल पंचक्रोशीतून सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg