loader
Breaking News
Breaking News
Foto

थेट मराठवाड्यातून कोकणासाठी गणेशोत्सव विशेष रेल्वे जाहीर; खेड, चिपळूण, रत्नागिरीत थांबा

खेड (प्रतिनिधी) - कोकणवासीयांसाठी खुशखबर! मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले असून, दक्षिण मध्य रेल्वेने गणेशोत्सवातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन नांदेड - सावंतवाडी रोड - नांदेड दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी नांदेड - पुणे - कल्याण - रत्नागिरी - सावंतवाडी मार्गावर धावणार असून कोकणातील चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गाडीचे वेळापत्रक -गाडी क्र. ०७६५९ (नांदेड ते सावंतवाडी रोड विशेष) फेर्‍या: १२ आणि १५ सप्टेंबर २०२६ (शनिवार व मंगळवार) वेळ: नांदेडवरून रात्री ०८:०० वा. सुटेल आणि तिसर्‍या दिवशी पहाटे ०३:३० वा. सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गाडी क्र. ०७६६० (सावंतवाडी रोड ते नांदेड विशेष) फेर्‍या: १४ आणि १७ सप्टेंबर २०२६ (सोमवार व गुरुवार) वेळ: सावंतवाडी रोडवरून सकाळी ०७:३० वा. सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ११:३० वा. नांदेड येथे पोहोचेल. प्रमुख थांबे - नांदेड, पूर्णा, परभणी, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, येडशी, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.

टाईम्स स्पेशल

डब्यांची रचना (एकूण २४ डबे) - २-टियर एसी ३ डबे, ३-टियर एसी ५ डबे, शयनयान १० डबे, सामान्य द्वितीय श्रेणी: ४ डबे, एसएलआर २ डबे. या विशेष गाडीसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष भाडे दर आकारला जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg