loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणातील ठेकेदारांसाठी आनंदाची बातमी, रत्नागिरी आणि चिपळूण विभागासाठी १० कोटीचा निधी प्राप्त

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणातील ठेकेदारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तब्बल दहा कोटी रुपयांचा निधी रत्नागिरी आणि चिपळूण विभागाला प्राप्त झाला असून, यामुळे रखडलेल्या कामांच्या बिलांचा मार्ग मोकळा झाला आहे. एरवी गणेशोत्सवात कोकणात येणार्‍या चाकरमान्यांसाठी खड्ड्यांच्या त्रासामुळे प्रशासनावर टीका होत असते, मात्र यंदा उत्सवाच्या काही दिवस आधीच शासनाने तिजोरीचे तोंड उघडल्याने ठेकेदार वर्गात एकच समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात हजारो वाहनांची भर पडणार असून रस्त्यांवर प्रचंड वाहतूक ताण असणार आहे. हाच ताण लक्षात घेऊन राज्य मार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांच्या तातडीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी हा १० कोटींचा निधी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, रत्नागिरी आणि चिपळूण या दोन्ही प्रमुख विभागांना प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. गेल्या काही काळापासून कामांची बिले न मिळाल्यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या ठेकेदारांना या निधीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक ठेकेदारांनी बिलांच्या प्रतीक्षेत आपली कामे अर्धवट सोडली होती किंवा नवीन कामांसाठी हात आखडता घेतला होता.

टाईम्स स्पेशल

आता हा निधी हाताशी आल्यामुळे रस्त्यांची डागडुजी वेळेत पूर्ण होईल आणि गणेशोत्सवात कोकणात येणार्‍या नागरिकांना खड्डेमुक्त रस्त्यांचा प्रवास अनुभवता येईल, अशी चिन्हे दिसत आहेत. गणेशोत्सवाच्या अगदी पूर्वसंध्येला शासनाकडून आलेला हा निधी म्हणजे जणू ’बाप्पा’च पावल्याची भावना ठेकेदार वर्गात व्यक्त होत आहे. प्रशासकीय पातळीवरही या निधीचे योग्य नियोजन करून तातडीने बिले अदा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या आर्थिक दिलासामुळे केवळ ठेकेदारांचे चेहरे फुलले नाहीत, तर कोकणातील गणेशोत्सवाचा रस्ता अधिक सुखकर होण्यासही मोठी मदत होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg