loader
Breaking News
Breaking News
Foto

शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर, सिंधुदुर्गातील दोन शिक्षिकांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मालवण - महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा सिंधुदुर्गचे यावर्षीचे आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आले आहेत. यात विनया विनायक कसालकर पुरस्कृत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार अ. के. टिकम गुरुजी विद्यामंदिरच्या शिक्षिका सिमंतिनी सुनील सावंत यांना, तर खासगी शिक्षक संघटना पुरस्कृत आदर्श शिक्षिका पुरस्कार मालवण येथील मोहनराव परुळेकर शाळेच्या शिक्षिका नीलिमा शिरिष कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिक्षक पुरस्काराचे हे विसावे वर्ष असून सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, महावस्त्र असं पुरस्काराचे स्वरुप असून संघटनेच्या वार्षिक स्नेहमेळाव्यात सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार मिळालेल्या या दोघांचेही संघटना अध्यक्ष गणपत चौकेकर, सचिव राजन नार्वेकर, शांताराम जंगले, प्रदीप सावंत आदींनी अभिनंदन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg