loader
Breaking News
Breaking News
Foto

माखजन इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांनी चालवली शाळा

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन, व ॲड. पी. आर. नामजोशी कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात आणि इंग्लिश मिडीयम स्कूल सरंद येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला. एक दिवस पूर्ण विविध विभागात विद्यार्थ्यांनी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय चालवली व विद्यार्थ्यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी होऊन, भूमीका बजावण्याचा प्रयत्न केला. छात्र शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांना, विषय शिक्षकांनी मार्गदर्शन केले. व आपल्या मुलांचे कौतुक पाहण्यासाठी थेट विद्यार्थी बाकावर बसून आनंद घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

छात्र शिक्षकांची भूमिका तसेच शाळेतील अन्य शिक्षकेतर कर्मचाऱ्याची भूमिका प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी अनुभवल्याने प्रत्येकाला जबाबदारी, स्टेज डेअरिंग, व्यवस्थापन, वेळेचे महत्व, संघटन कौशल्य, विद्यार्थ्यात विकसित होण्यास मदत होत असल्याचे मत मुख्याध्यापक महादेव परब यांनी व्यक्त केले. यावेळी नियोजनाप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे विषय शिकवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पर्यवेक्षक अंबादास घाडगे, इंग्रजी माध्यम मुख्याध्यापिका धनश्री राजेसावंत भोसले, शिक्षक प्रतिनिधी अमोल पाटील, आदिंसह अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी छात्र शिक्षकांना मुख्याध्यापक महादेव परब यांनी मार्गदर्शन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg