loader
Breaking News
Breaking News
Foto

भोस्ते घाटात ओव्हरटेकच्या नादात कारची दुचाकीला धडक; महिला गंभीर जखमी

खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात व्हॅगनार कारने समोरून जाणाऱ्या स्प्लेंडर दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. बुधवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी महिलेला उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, अपघातानंतर व्हॅगनार कार क्रमांक MH 06 CU 0843 चा चालक घटनास्थळी न थांबता मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने निघून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या आर्टिगा कारचालकाने धाडसाने व्हॅगनारचा पाठलाग केला आणि महामार्गावरील वेदर येथील उड्डाणपुलावर कार अडवली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत व्हॅगनार चालकाला ताब्यात घेतले असून, या अपघाताचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg