loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवासाचा मार्ग अधिक सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या तयारीचा सज्जता आढावा घेत मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांचा प्रवास यंदा अधिक सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून रस्त्यावरील अपूर्ण कामे, सुरक्षेच्या उपाययोजना आणि वाहतूक नियमनाबाबत मोठे पावले उचलली आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर होणारी गर्दी आणि अपघातांची शक्यता लक्षात घेता परिवहन विभागाने तातडीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवासाचा मार्ग अधिक सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महामार्गावर जिथे रस्त्याची कामे अपूर्ण आहेत, तिथे अपघात टाळण्यासाठी तात्काळ रस्ता सुरक्षा फलक, रेडियम टेप्स आणि ब्लिंकर्स बसवण्याचे काम पीडब्ल्यूडी नॅशनल हायवेच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उत्सव कालावधीमध्ये या महामार्गांवर वायुवेग पथकांची सतत गस्त असणार आहे. प्रवासादरम्यान जर कोणाचे वाहन अचानक बंद पडले किंवा एखादी दुर्दैवी अपघाताची घटना घडली, तर बाधित प्रवाशांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली जाईल, जेणेकरून वाहतूक कोंडी किंवा प्रवाशांचे हाल टळू शकतील. याशिवाय, गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून महामार्गावरील वाहतूक सुरळीत चालण्यासाठी आणि प्रवाशांची कोणतीही फसवणूक होऊ नये म्हणून परिवहन विभागाने रिक्षा आणि खासगी बस संघटनांशी चर्चा केली आहे. प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळणार्‍या किंवा प्रवाशांशी उद्धट वर्तन करणार्‍या चालकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार असून, यासाठी उत्सवाच्या काळात वायुवेग पथके विशेष लक्ष ठेवून असणार आहेत.

टाईम्स स्पेशल

विसर्जनाचे दिवस आणि गर्दीच्या मोसमात महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवली जाणार आहे, मात्र अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहने या नियमातून वगळण्यात आली आहेत. सर्वसामान्यांचा हा लाडका गणेशोत्सव कोणत्याही विघ्नाशिवाय आणि आनंदाने पार पाडावा, यासाठी सर्व नागरिकांनी व वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg