loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवार आंबेरे शाळेच्या रश्मी वाडेकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

रत्नागिरी : अतिशय दुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद आदर्श शाळा शिवार आंबेरे नं. २ ने शैक्षणिक, क्रीडा आणि विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. या यशामुळे शाळेला सन २०२४-२५ चा आदर्श शाळा पुरस्कार मिळाला असून, याच शाळेतील शिक्षिका रश्मी राजन वाडेकर यांना यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. शिवार आंबेरे नं. २ येथील या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असून रश्मी राजन वाडेकर आणि राजन बाळकृष्ण वाडेकर हे शिक्षक कार्यरत आहेत. मर्यादित सुविधा आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीवर मात करत शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचा निकाल तब्बल १०० टक्के लागला असून, एका विद्यार्थिनीने गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. तसेच मंथन परीक्षेत दोन विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत झळकल्या आहेत. क्रीडा क्षेत्रातही शाळेतील विद्यार्थ्यांनी सलग तीन वर्षे जिल्हास्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे. शाळेच्या परसबाग उपक्रमाचीही विशेष दखल घेण्यात आली आहे. सलग तीन वर्षे परसबाग उपक्रमात शाळेने तालुक्यात स्थान मिळवले असून यावर्षी तालुक्यात प्रथम क्रमांक, तर जिल्ह्यात चौथा क्रमांक पटकावला आहे.

टाईम्स स्पेशल

शाळेच्या या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत सन २०२४-२५ चा आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर शाळेतील शिक्षिका रश्मी राजन वाडेकर यांना यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने शाळेच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या यशामागे शाळा व्यवस्थापन समिती, पालक, सर्व ग्रामस्थ, मुंबई मंडळाचे सर्व सदस्य, ग्रामपंचायतीची संपूर्ण टीम तसेच वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रयत्न यांचा मोठा वाटा असल्याचे सांगण्यात आले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत शिवार आंबेरे शाळेने परिसरातील इतर शाळांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg