loader
Breaking News
Breaking News
Foto

पोषण आहारात एक्सपायर मसाले, धान्याचा साठा शौचालया शेजारी

कुडाळ, (प्रतिनिधी) : कुडाळ शहरातील एका विद्यालयात विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शालेय पोषण आहारात मुदत संपलेले मसाले वापरले जात असून धान्याचा साठा थेट स्वच्छतागृहाच्या शेजारी ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. प्रकार समोर येताच शिंदे सेनेच्या पदाधिकार्‍यांनी शाळेत धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. या शाळेत ४०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असून दररोज सुमारे १४० मुले पोषण आहार घेतात. मात्र या चिमुकल्यांच्या आरोग्याशीच खेळ सुरू असल्याचे दिसून आले. पोषण आहारासाठी लागणारे मसाले एक्सपायर झाले होते, तर तांदूळ अस्वच्छ ठिकाणी स्वच्छतागृहाशेजारी साठवला होता. शिक्षक मुलांची हजेरी घेतात मात्र स्वतःच्या हजेरीपटावर सही करायला विसरतात, असा भोंगळ कारभारही उघड झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी चंदनशिवे, गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत आणि उपशिक्षणाधिकारी किंजवडेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व निकृष्ट साहित्याचे नमुने ताब्यात घेतले. यावेळी अंगणवाडी नेत्या कमल परुळेकर, शिंदे शिवसेनेचे गटनेते विलास कुडाळकर नगरसेवक अभिषेक गावडे, आबा धडाम, प्रथमेश कांबळी, चंदन कांबळी, संदेश सावंत यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. कुडाळसारख्या मध्यवर्ती शाळेत हा प्रकार घडत असेल तर जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळांची काय अवस्था असेल, असा सवाल पालकांमधून उपस्थित होत आहे. शासन कोट्यवधींचा निधी देत असतानाही मुलांच्या ताटात एक्सपायर अन्न येत असेल तर प्रशासनाने केवळ एका शाळेवर कारवाई न करता जिल्ह्यातील सर्व शाळांमधील पोषण आहाराची कसून तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg