loader
Breaking News
Breaking News
Foto

ए.जी. हायस्कूल विद्या भारती संलग्न विभागाची पश्चिम क्षेत्र विभागीय व कोकण प्रांत खेलकुद स्पर्धेत दमदार कामगिरी

संगलट (इक्बाल जमादार) - दापोली शिक्षण संस्था संचालित ए.जी. हायस्कूल विद्या भारती संलग्न विभागाची पश्चिम क्षेत्र विभागीय व कोकण प्रांत खेलकुद स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. दि. ३ सप्टेंबर २०२६ डेरवण येथे संपन्न झालेल्या विविध क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये १७ वर्षाखालील बॅडमिंटन स्पर्धेत मुलांचा द्वितीय क्रमांक आला. सहभागी खेळाडू- 1-वरद वैद्य, 2-अमोघ जोशी, 3-स्नेहराज राठोड. विदयाभारती अखिल भारतीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता अमोघ जोशी आणि स्नेहराज राठोड यांची निवड झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच विद्याभारती कोकण प्रांत मैदानी स्पर्धेत 100 मी धावणे 14 वर्षाखालील मुली सार्थकी दाभोळे - प्रथम क्रमांक, स्वरा मोरे तृतीय क्रमांक. सार्थकी दाभोळे हिची पश्चिम क्षेत्र विभागीय खेलकुद स्पर्धे करता निवड झाली आहे. वरील सर्व खेळाडूंनी विद्याभारती क्रीडा प्रमुख शैलेश मिसाळ, क्रीडा शिक्षक प्रथमेश दाभोळे, मीनल रसाळ, आणि कोकण प्रांताचे खेलकुदचे अध्यक्ष प्रमोद पारसी यांच्या मार्गदर्शनाखाली सुयश संपादन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शकशिक्षक यांचे संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रसाद करमरकर, सेक्रेटरी डॉ. विनोद जोशी, शालेय समिती चेअरमन रवींद्र कालेकर, सदस्या स्मिता सुर्वे तसेच सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद कांबळे, उपमुख्याध्यापक मगदूम एस.आय. पर्यवेक्षक अनिल पेठकर, पर्यवेक्षिका सोनाली मेहंदळे, विद्याभारती समन्वयक स्वरदा थोरात, विद्याभारती शिक्षकवृंद प्रिया पास्ते, आकांक्षा अस्वले, संगीता माने, मयुरेश बने, अमित गुरव तसेच ए.जी. हायस्कूल, दापोली शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg