loader
Breaking News
Breaking News
Foto

‘मयूरपंख २०२६’ चा पारितोषिक सोहळा उत्साहात संपन्न!

दापोली(प्रतिनिधी) - दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ येथे १ सप्टेंबर २०२६ ते ३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मयूरपंख २०२६ या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विद्यापीठांतर्गत घटक व संलग्न असे १८ महाविद्यालयातील ४६० विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘मयूरपंख’ या सास्कृतिक युवा महोत्सवात नृत्य, नाट्य, संगीत, कला आणि ललित कला अशा एकूण २२ स्पर्धात्मक कला प्रकारांचा समावेश करण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेचे विजेतेपद कृषि महाविद्यालय, दापोली यांनी ९६ गुणांसह पटकावले तर उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांनी ८९ गुणांसह उपविजेते पटकावले. या स्पर्धेतील गोल्डन बॉय हा किताब उद्यानविद्या महाविद्यालय, मुळधे येथील विद्यार्थी ऋदेश कानडे याने पटकावला व गोल्डन गर्ल हा किताब सिध्दी चौधरी हीने पटकावला, विजेत्यानां मान्यवराच्यां हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेकरिता संगीत विभाग विणा महाजन, कुडावळे, देविदास दातार, दापोली अमेय आखवे दापोली यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले तर शास्त्रीय नृत्य स्पर्धेकरिता वेदिका दांडेकर, दापोली गौरी करंदीकर, दापोली यांनी काम पाहिले. लोकनृत्य स्पर्धेकरिता लक्ष्मण पडवळ, मुंबई, सुरेंद्र जाधव, मुंबई यांनी काम पाहिले, साहित्यकला स्पर्धेकरिता डॉ. प्रमोद सावंत, दापोली, डॉ. दिपक हर्डिंकर, दापोली, प्राध्यापक कुणाल मंडलिक यांनी काम पाहिले, रंगमंच विभाग स्पर्धेकरिता अभिषेक कोयंडे, देवगड, आशा कोयंडे, देवगड, आकाश सपकाळ, देवगड यांनी काम पाहिले, ललितकला विभाग स्पर्धेकरिता अमित सुर्वे, सावर्डे, सुनिल दरीपकर, दापोली, संतोष बुरटे, दापोली यांनी काम पाहिले, संचालन स्पर्धेकरिता डॉ. व्ही. जी. पाटील, दापोली, लक्ष्मण पडवळ, मुंबई, विजय पारकर, दापोली यांनी काम पाहिले.

टाईम्स स्पेशल

मयूरपंख २०२६ च्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाला विद्यापीठाने संशोधन संचालक, डॉ. प्रशांत शहारे, विस्तार शिक्षण संचालक, डॉ. संजयकुमार तोरणे, कुलसचिव, उमेश चांदीवडे, संचालक, क्रिडा, कला व सहशैक्षणिक उपक्रम डॉ. अरुण माने, सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, दापोली डॉ. रमेश कुणकेरकर, सहयोगी अधिष्ठाता, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ. संदीप जैन, सहयोगी अधिष्ठाता, वन शाखा महाविद्यालय, दापोली डॉ. अजय राणे सहयोगी अधिष्ठाता, उद्यानविघा महाविद्यालय, दापोली डॉ. श्रीमती गार्गी शिर्के, कृषि महाविद्यालय, दापोलीच्या विद्यार्थी परिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. पुष्पा पाटील, विद्यापीठ सांस्कृतिक समन्वयक, डॉ. निलेश शिरसाट, कृषि महाविद्यालय, दापोली सांस्कृतिक समन्वयक, डॉ परेश पोटफोडे, कार्यक्रमास उपस्थित होते. सदर कार्यक्रम पार पाडण्याकरिता सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, दापोली यांचे मार्गदर्शनाखाली माहाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांनी काम केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg