loader
Breaking News
Breaking News
Foto

क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरीतर्फे १९ वा वर्धापन दिन सोहळा

रत्नागिरी (जमीर खलफे) : येथील क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी या मंडळाचा 19वा "वर्धापन दिन सोहळा" रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी अंबर हॉल, गणेश कॉलनी, टी.आर.पी येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर प्रसंगी कुलस्वामिनी माता श्री तुळजा भवानीची पूजा, स्वागतगीत, मान्यवर व्यक्ती आणि गुणवंताचे सत्कार आयोजित करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सत्कार समारंभासाठी रत्नागिरी तालुक्यातील मराठा समाजातील 90 वर्षे पुर्ण केलेल्या जेष्ठ नागरीकांचा सत्कार, शैक्षणिक वर्षे 2025-26 मध्ये CET 80किंवा 80+पर्सेंटाइल्स, आणि JEE 80किंवा 80+पर्सेंटाइल्स तसेच NEET 720 पैकी 450 किंवा 450+ गुण प्राप्त, पदवी व पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केलेले मराठा समाजातील विद्यार्थी तसेच रत्नागिरी तालुक्यातील सन 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या इ. 5वी व इ. 8वी शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप), तसेच NMMS परीक्षेतील मराठा समाजातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, तसेच राष्ट्रीय पातळीवर यशस्वी झालेल्या कला, क्रीडा, सामाजिक इ. विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या मराठा समाजातील व्यक्तींचे सत्कार करणेत येणार आहेत.

टाईम्स स्पेशल

पात्र विद्यार्थी, नागरीकांनी आपली सविस्तर माहिती मंडळाच्या कार्यालयात बेसमेंट स्टोअर क्र.3, बी-विंग, सिध्दीविनायक रेसिडेन्सी गोडबोले स्टॉप, मजगाव रोड, रत्नागिरी येथे २० सप्टेंबरपर्यंत रविवार व सार्वजनिक सुट्टी सोडुन सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाठवावी. वरील प्राप्त माहितीवरुन सत्कारमुर्तींची निवड कार्यकारी मंडळातर्फे निश्‍चित करण्यात येईल, असे आवाहन क्षत्रिय मराठा मंडळाने केले आहे. अधिक माहितीसाठी 7020357030 किंवा 8830974065 या क्रमांकावर संपर्क साधावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg