loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर आगारात एसटीला चार तास ’ब्रेक’; कर्मचार्‍यांचा अघोषित संप....!

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर आगारातील एसटी वाहतूक गुरुवारी तब्बल चार तास ठप्प राहिल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. एसटी बसेसना अधिकृत थांबा नसलेल्या हॉटेल्स व ढाब्यांवर थांबविल्याबद्दल चालक-वाहकांवर कारवाई करण्याचे लेखी आदेश निघाल्याने कर्मचार्‍यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. या कारवाईच्या निषेधार्थ बहुतांश चालक-वाहकांनी ज्यादा ड्युटी करण्यास नकार देत प्रशासनाला सहकार्य न करण्याची भूमिका घेतली. परिणामी चालक-वाहकांच्या कमतरतेमुळे सकाळी १० वाजल्यानंतर गुहागर आगारातून एकही एसटी बस मार्गस्थ झाली नाही. मात्र त्यानंतर गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर व उपसभापती निलेश सुर्वे यांनी यशस्वी चर्चा केल्यानंतर गुहागर आगाराच्या बसेस मार्गस्थ झाल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुहागर-मुंबई मार्गावर तसेच मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीच्या बसेस अनेक ठिकाणी हॉटेल किंवा ढाब्यावर थांबत असतात. विशेषतः लांब पल्ल्‌याच्या प्रवासात प्रवाशांना चहा, नाश्ता, जेवण तसेच नैसर्गिक विधींसाठी विश्रांतीची आवश्यकता असते. मात्र, या मार्गावर एसटीचा अधिकृत थांबा असलेली हॉटेल्स किंवा ढाबे नेमके कोणते, याबाबत स्पष्ट लेखी आदेश नसल्याचा मुद्दा चालक-वाहकांनी उपस्थित केला आहे. एका बाजूला प्रवाशांच्या सोयीसाठी बस थांबविणे आवश्यक असताना दुसर्‍या बाजूला अधिकृत थांबा नसलेल्या ठिकाणी बस थांबविल्यास चालक-वाहकांवर कारवाई केली जात असल्याने कर्मचार्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg