loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रा. आर. डी. काळे ’महाराष्ट्र राज्यभूषण पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

खेड (प्रतिनिधी) - शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय, अविस्मरणीय आणि गौरवास्पद कार्याची दखल घेत संघराज फाउंडेशन, सावर्डे (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा ’महाराष्ट्र राज्यभूषण पुरस्कार २०२६’ हा राज्यस्तरीय पुरस्कार नवभारत हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक प्रा. आर. डी. काळे यांना प्रदान करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात हा सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. संघराज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुशांत प्रजापती यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. काळे यांनी शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्यामुळे त्यांना हा राज्यस्तरीय सर्वोच्च सन्मान मिळाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg